Rain Update : या भागात प्रचंड पाऊस कोसळणार

रविवार, 21 मे 2023 (12:09 IST)
आता मे महिन्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. सुरुवातीच्या काही दिवस आगोदर पावसाने उच्छाद मांडला होता. वातावरणात गारवा जाणवत होता. आता तापमानात वाढ होऊ लागली आहे. तापमान वाढीमुळे नागरिकांचे हाल होत आहे. उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. .आता मान्सून येणार कधी असा सवाल उद्भवत आहे. मान्सून या यायला काहीच दिवस उरलेले आहे.  हवामान खात्यानं सांगितले आहे की, भारतातील 19 टक्के प्रदेशात मान्सून मध्ये कमी पाऊस पडणार आहे. तर काही भागात जास्त पावसाचा सामना करावा लागणार आहे. 
 
उत्तरेकडील भागात कमी पावसाची 52 टक्के आणि देशाच्या मध्यवर्ती भागात 40 टक्के कमी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात सामान्यपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 
यंदा मान्सून 4 जून रोजी केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
हवामान खात्यानुसार मान्सून अंदाजे 2 -3 दिवस पुढे मागे असण्याची शक्यता वर्तवली आहे. 
स्कायमेटच्या मतानुसार यंदा मान्सून एक शक्तिशाली वादळ विषुववृत्तीयअक्षांश आणि दक्षिण द्वीपकल्पात दक्षिण हिंद महासागराच्या दिशेने जात असल्यामुळे मान्सून उशिरा येण्याची शक्यता वर्तवली आहे.  
 



Edited by - Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती