वीज कर्मचाऱ्यांवर संपाप्रकरणी मेस्माअंतर्गत कारवाई?

मंगळवार, 29 मार्च 2022 (09:04 IST)
उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी होणारी महावितरण कर्मचाऱ्यांसोबतची उद्याची बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. संप मागे घेण्याचं आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. सर्व वीज कर्मचारी संघटनासोबत ही बैठक पार पडणार होती.
 
वीज कर्मचारी आपल्या काही मागण्या घेऊन आंदोलन करणार आहेत. कर्मचारी संघटनांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांशी बैठक घेऊन मार्ग सोडवण्याच्या विचारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करू मात्र, त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं होतं. मात्र कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याची भूमिका न घेतल्याने ही बैठक रद्द झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती