बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या लॅबवर कारवाई शासनाने केली कारवाई सुरु

बुधवार, 26 जून 2019 (16:29 IST)
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजीस्ट या संघटनेच्या तक्रारीनंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या लॅबवर कारवाई करण्यात आली आहे. पाच डॉक्टरांना निलंबित करण्यात आले असून, ३ डॉक्टरांवर कारवाई सुरू आहे. पदवीधर पॅथॉलॉजीस्टची संख्या कमी असल्याने तातडीने ही पदे भरण्यासाठीची कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिली. आज विधानसभेत राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅब संदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना रविंद्र चव्हाण बोलत होते.श्री.चव्हाण म्हणाले, वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध तक्रारीची चौकशी करून दोषी वैद्यकीय व्यावसायिकांना शिक्षा देण्याचे अधिकार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला आहेत. त्यानुसार संबंधित बेकायदेशीर लॅबवर कारवाई करण्यात येत आहे. शासनाने महाराष्ट‍्र पॅरावैद्यक व्यवसायींची नोंदणी, नोंदणीकृत पॅरावैद्यकीय व्यवसायाविषयक वर्तवणुकीचे विनियम, त्यांचे विरूद्ध निलंबन अथवा शिस्तभंगाची कारवाई करणे तसेच अनधिकृत लॅब धारकांविरूद्ध कठोर कारवाई करणे शासनास शक्य होणार आहे. शासकीय पॅथॉलॉजी लॅबमधील रिक्त जागा भरण्यात येतील. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पॅथॉलॉजी लॅबमध्ये करण्यात येईल, अशी माहितीही श्री.चव्हाण यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती