TikTok ची वाढती प्रतिक्रीया

शनिवार, 18 मे 2019 (10:13 IST)
अनेकांचा विरोध असला तरी TikTok ची लोकप्रियता कमी झालेली नाही. कारण वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीतील सर्वेनुसार टिकटॉकने फेसबुकसारक्या मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटला मागे टाकल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान टिकटॉकचे जगभरातून १८ कोटी युजर्स वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अॅप इन्स्टॉल करण्याचे प्रमाण मागच्यावर्षीपेक्षा यावर्षी ७० टक्क्यांनी वाढले आहे. सेन्सॉर टॉवर या अप्लिकेशन एक्सपर्ट कंपनीने हा अहवाल प्रकाशित केला आहे.
 
यापैकी भारतात सर्वाधिक ४७ टक्के तर चीनमध्ये ७.५ टक्के डाऊनलोड करण्याचे प्रमाण राहिले आहे. मागच्या तिमाहीत भारतातून अंदाजे ८ कोटी युजर्सनी भारतात हे अॅप डाऊनलोड केले होते, तर हेच प्रमाण अमेरिकेत एक कोटी ३० लाख एवढे आहे. भारतात टिकटॉकचे एकून युजर्स आता २० कोटींच्या आसपास पोहोचले आहेत. महत्त्वाचा भाग म्हणजे टिक टॉक वाढण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकने सुद्धा मदत केलेली आहे. टिक टॉकची मालक असलेल्या कंपनीने डाऊनलोड्स वाढवण्यासाठी फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम साईटवर जाहीरात दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती