अहमदनगर येथे सागर विलास कानडे या विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गौरी जगताप या महिलेला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. गौरीच्या जाचाला कंटाळून सागरने २ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे वडील विलास कानडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गौरी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्याचे वडील विलास कानडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गौरी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला असलेली गौरी व नगरमधील सागर यांची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, गौरी हिने प्रेमाचा गैरफायदा घेत सागर याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. बायकोला सोडून तू माझ्याबरोबर राहण्यास ये, अशी मागणी ही महिला वेळोवेळी फोनवरून करत होती. पैशांची मागणी देखील ती करत होती. अखेर तिच्या जाचाला कंटाळून सागरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी व मोबाईलवरील मेसेज पाहता संबंधित महिलेनेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करत गौरीला पुणे जिल्ह्यातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता तिला १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सागर हा एक होतकरू तरूण होता. परंतु गौरीच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, गौरीला सोडू नका, असे त्याने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित म्हटले आहे.