भरदिवसा विवाहित महिलेवर अ‍ॅसिड ने हल्ला

शनिवार, 22 जानेवारी 2022 (13:38 IST)
नागपुरातील रामेश्वरी परिसरात अजनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात शनिवारी खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात माणसाने एका विवाहित महिलेवर अ‍ॅसिड ने हल्ला केला. नंतर आरोपी पसार झाला.ही महिला कामासाठी आपल्या दुचाकीवर बाहेर निघाली असता आरोपी पती बाईकने तिच्या विरुद्ध दिशेने आला आणि तिच्यावर अ‍ॅसिड टाकून हल्ला करून पसार झाला. 
 
पोलिसांना घटनेची माहिती समजतातच त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास पथक पाठवले आहे. महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती