30 हजारांसाठी सावकारानं उचलून नेली दीड महिन्याची चिमुकली, 4 महिने स्वतःकडे ठेवलं बाळ

शनिवार, 22 जानेवारी 2022 (10:28 IST)
साताऱ्यामध्ये एका सावकारानं कर्जाच्या वसुलीसाठी एका कुटुंबातील दीड महिन्याच्या चिमुकलीलाच घरातून उचलून नेल्याची घटना घडली आहे. 

जवळपास चार महिने या सावकारानं बाळ त्याच्याजवळच ठेवलं. सावकार ते बाळ परत देत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत बाळाला पुन्हा आईच्या ताब्यात दिलं आहे.
 
साताऱ्याच्या अभिषेक कुचेकर कुटुंबीयांबरोबर हा प्रकार घडला. त्यांनी सावकाराकडून 30 हजार रुपये घेतले होते. त्याची व्याजापोटी 60 हजारांची फेड केल्यानंतर सावकार पैशाची मागणी करत होता.
 
या प्रकारातून चार ते पाच महिन्यांपूर्वी सावकाराने कुचेकर यांच्या दीड महिन्याच्या मुलीला घरातून उचलून नेलं. वारंवार मागणी करूनही बेकायदेशीररित्या मुलीला सावकारानं ताब्यात ठेवलं होतं.
 
कुचेकर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसंच मुलगी परत हवी असेल तर चार-पाच लाख रुपये देण्याची मागणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती