ला निनो परिस्थिती राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग पावसाचा इशारा

शनिवार, 22 जानेवारी 2022 (08:58 IST)
ला निनो परिस्थिती राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 23 आणि 24 जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, आधीपासूनच अवकाळीनं राज्याची चिंता वाढवली आहे.अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावत असल्यामुळं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलतं हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे.

ला निनो परिस्थिती म्हणजे काय?
पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यानं, प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. यालाच सदर्न ऑसिलेशन असं म्हणतात. ला-निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होतं. त्याचा परिणाम फक्त इथेच नाही तर शेजारी असलेल्या हिंदी महासागरातल्या सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो. पर्यायानं ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला-निनाच्या प्रभावामुळे एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती