आरोपी चार महिन्यांपूर्वी घटस्फोटित महिलेला सोशल मीडियावर भेटलाआणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा महिलेने त्याच्यासोबतचे नाते संपुष्टात आणले आणि त्याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडली.
महिलेचा आरडाओरडा ऐकून तिची आई आणि मुलगा सावध झाले आणि मदतीसाठी धावले. शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत हत्येच्या प्रयत्नासह गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.