गाडी चालवत असताना पावसाचे पाणी अंगावर उडाल्याने तरुणाला बेदम मारहाण

मंगळवार, 27 मे 2025 (10:28 IST)
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे एकीकडे लोकांचे हाल होत असताना, दुसरीकडे एका छोट्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एका तरुणाला मारहाण झाल्याची बातमी आहे. रस्त्यावरील मेस बॉक्स देण्यासाठी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या पायावर रस्त्यावर साचलेले पाणी पडल्याने 4 जणांनी बाइकस्वाराला मारहाण केली. या मारहाणीत बाईक चालकाचा हात तुटला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
ALSO READ: माजलगावचे भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा रस्ते अपघातात मृत्यू
भूषण मेनकुडले (रा. सदाफुले वस्ती जामखेड) यांनी जामखेड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे की, शुक्रवारी दुपारी 1 वाजता ते मेस बॉक्स देण्यासाठी मोटारसायकलवरून घरी जात असताना, डॉ. धुमाळ यांच्या जुन्या क्लिनिकसमोरील रस्त्यावर पाणी आणि चिखल साचल्यामुळे मोटारसायकल हळू चालत होती.

त्यावेळी समरुन हुजीब अन्वर कुरेशी त्याच्या मोटारसायकलवरून येत होता.भूषणच्या मोटारसायकलच्या टायरमधून पाणी त्याच्या पायावर पडले आणि त्याने भूषणला अडवून माझ्यावर  पाणी का उडवले असे विचारले असताना भूषण ने चुकून उडाले असे म्हटल्यावर भूषणने माफी मागितली तरीही हुजीब ने त्याला शिवीगाळ केली.
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर: दरोड्यात काही पोलिसांचा सहभाग होता, संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ उडाली
नंतर शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता मी बाईकवरून मेसबॉक्स घेऊन जात असताना हुजेब आपल्या सोबत इतर तिघांना घेऊन आला आणि लाकडी दांडाने भूषणला मारहाण करायला सुरु केले आणि गळा आवळ्याचा प्रयत्न केला नंतर हुजेबच्या सोबत आलेल्यांनी भूषणाच्या हातावर, पायावर, मांडीवर लाकडाच्या दांड्याने मारहाण केली. 
ALSO READ: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नागपूरमध्ये 'स्वस्ती निवास'ची पायाभरणी करत देशाचे आरोग्य क्षेत्र मजबूत झाल्याचे सांगितले
दरम्यान भूषणचा ओळखीचा रमेश तिथे आला आणि त्याने भूषणची त्यांच्या तावडीतून सुटका केली.  भूषण मेनकुडले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
  
Edited By - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती