मिळालेल्या माहितीनुसार अमृतसरच्या मजिठा येथे बनावट दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मुख्य पुरवठादाराचाही समावेश आहे. त्याचबरोबर, आणखी किती लोकांनी हे दारू सेवन केले आहे याचीही चौकशी केली जात आहे. सध्या पोलिसांनी सांगितले आहे की सुमारे पाच गावातील लोकांना विषारी दारूची लागण झाली आहे. याशिवाय या प्रकरणात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहे.