जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा गळा आवळून खून

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (21:08 IST)
घुणकी (ता.हातकणंगले) येथे शेतात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या सुषमा अशोक जाधव- सनदे (वय ३८) या महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना उघडकीस आली. गुरुवारी सकाळपासून ही महिला बेपत्ता होती. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरु आहे. दरम्यान खुनाचा तपास वडगाव पोलिसांनी गतिमान केला असून तपासासाठी पथके रवाना केली आहेत.
 
या बाबत पोलिसाकडून व घटनास्थळावरून घेतलेली माहिती अशी, घुणकी येथील सुषमा जाधव या शेतात जनावरे चरविण्यासाठी घेवून जात असत गुरुवारी सकाळी घुणकी गावच्या उत्तरेस वारणा नदीच्या बाजूला असणाऱ्या डाग नावाच्या भागात गेल्या होत्या. त्या परत न आल्यामुळे कालपासून शोधाशोध सुरु होती.
 
आज सकाळी त्यांचा मृतदेह तेथील उसाच्या फडात आढळला. या घटनेची वर्दी पोलीस पाटील संदीप तेली यांनी वडगाव पोलिसात दिली. घटनास्थळी जयसिंगपूर विभागाच्या डीवायएसपी रोहिणी साळुंके, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती