उसतोडणीसाठी नेल्याने उसतोड मजूराच्या मुलीची आत्महत्या

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (21:02 IST)
जत तालुक्यातील (पांडोझरी) पारधी तांडा येथील गीता दत्तु चव्हाण (वय १७, रा.पांडोझरी पारधीतांडा) या अल्पवयीन मुलीने घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. विषारी रासायनिक द्रव्य पिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वडिलांना ऊसतोडीसाठी दबाव टाकल्याने तिने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
 
मयत गीता हिचे वडील दत्तु भवानी चव्हाण (वय ४५) हे ऊसतोडणी कामगार आहेत. त्यांनी तोडीसाठी उचल घेतली होती. पण ते कामावर न गेल्याने करेवाडी येथील मुकादम याने गुरुवारी त्यांना घरातून उचलून नेले. या घटनेमुळे मुलगी गीता प्रचंड मानसिक तणावात होती. याच करणातून तिने आत्महत्या केली असावी असे नातेवाईक सांगत आहेत.
 
दरम्यान, गुरुवारी रात्री तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती