नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत्यु नंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या खोलीत पाहिले हाताची नस कापली. नंतर तिने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. इंटरनेटवर केलेल्या शोधातून हे केल्याचे समोर आले आहे.
मयत मुलगी 12 वीची विद्यार्थिनी असून तिचे वडील आरबीआय मध्ये अधिकारी पदावर असून आई गृहिणी आहे. या मुलीचे कुटुंब छत्रपति नगर परिसरात राहतात तर मुलीचे मामा त्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात.या मुलीला ऑनलाइन गेमिंगची आवड होती.