मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा एक मोठा प्रकार नागपूरमधून उघडकीस आला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्याबद्दल पोलिसांनी शिक्षण समुपदेशन केंद्राच्या संचालकांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींनी दोन विद्यार्थिनींच्या पालकांकडून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 75 लाख रुपये घेतले. पण कोणालाही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.