हिंगोलीत सेनगाव तालुक्यातील खडकी गावात सरकारी कर्मचाऱ्याला घरात कोंडून बेदम मारहाण करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून मारहाण केल्याचे समजते. आरोपीला अटक करण्यात आली आहे. रामकिसन हराळ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते जिल्हापरिषदचे कर्मचारी आहे. जागेच्या वादातून त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर घटना सहा दिवसांपूर्वीची आहे.