आई आणि मुलाचे नाते वेगळेच आहे. पण आईच्या नावाला काळिमा लावण्याची धक्कदायक घटना कोहापुरातून समोर आली आहे. या चिमुकलीने अंथरुणावर लघवी केली म्हणून तिच्या सावत्र आईने तिला गरम चिमट्याने प्रायव्हेट पार्ट, पाय, हात आणि तोंडाला, गळ्याजवळ चटके दिले.
कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात कासारवाडी येथे शुभम मोकिंदराव मगरे हे आपली पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलांसह राहतात. पूजा आणि शुभम यांचे हे दुसरे लग्न असून दोघांना पहिल्या लग्नापासून अपत्ये आहे. शुभमला एक मुलगी आणि पूजाला दोन मुले आहे. पोलिसांच्या चौकशीत मुलीने अनेकदा बेडवर लघवी केल्याचे समोर आले. या गोष्टीवरून पूजा त्याला रोज मारहाण करायची.