कॅनडामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना बर्फाळ जमिनीवर विमान उलटल्याने १९ प्रवासी जखमी

मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025 (09:11 IST)
कॅनडाची राजधानी टोरंटोमध्ये सोमवारी एक मोठा अपघात झाला. टोरंटोच्या पिअर्सन विमानतळावर लँडिंग करताना डेल्टा एअर लाइन्सचे विमान बर्फाळ जमिनीवर उलटले. या अपघातात १९ जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
ALSO READ: बीड न्यायालयाने जिल्हाधिकारी साहेबांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले
मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ प्राधिकरणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची पुष्टी केली आहे. टोरंटोच्या पिअर्सन विमानतळाने सांगितले की, अपघात मिनियापोलिसहून आलेल्या डेल्टा विमानाचा होता. विमानात ७६ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. डेल्टा एअर लाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, हा अपघात सोमवारी दुपारी ३:३० वाजता झाला. विमानतळाने सोशल प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपत्कालीन पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहे. तसेच हा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: नागपूर : एका कुख्यात गुन्हेगाराची त्याच्याच साथीदारांनी केली निर्घृण हत्या
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: ३.५ बीएचके फ्लॅटमध्ये ३०० मांजरी ठेवल्या, सोसायटीतील लोकांनी गोंधळ घातल्यावर कारवाई

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती