मिळालेल्या माहितीनुसार मयत अनुराधा आणि संशयित आरोपी भूषण भुजाडे यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. 9 सप्टेंबर रोजी मयत अनुराधा गावातील एका घरी महालक्ष्मीच्या आरतीसाठी जात असताना आरोपी भूषण याने त्यांना रस्त्याच्या मधोमध थांबवले त्याचवेळी दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपीने मृताचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मयत घाबरली आणि घरी जाऊन तण फवारणीसाठी वापरलेले औषध सेवन केले. तसेच तरुणीला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले पण यवतमाळच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी भूषण भुजाडेला ताब्यात घेतले आहे. पुढील घटनेचा तपास आर्णी पोलीस करत आहेत.