आंध्र प्रदेशातील विजयवाड्यात एका खासगी कंपनीत अफगाणिस्तानमधून काही इम्पोर्ट केल्याची माहिती DRI ला लागली आणि त्यात काही संशयास्पद आणि गैर असल्याची माहितीच्या आधारे DRI च्या अधिकाऱ्यांनी मुंद्रा बंदरावर आलेल्या दोन कंटेनरची झडती घेतली.त्यात अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचे काही पावडर सारखे पदार्थ आढळले.घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ देखील होते.त्यांनी त्या पांढऱ्या पावडरची चाचणी केल्यावर ती हेरोईन असल्याचे समजले.दोन्ही कंटेनर मिळून तब्बल 2 हजार 988.22 किलोग्रॅम हेरोईन असल्याचे आढळले.या हेरोईन ची किंमत सुमारे 9 हजार कोटी आहे.या छाप्या नंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद,गांधीधाम,मांडवी या ठिकाणी देखील छापे टाकले जात आहे.हे कंटेनर अफगाणांतून आले आहे.काही अफगाणी नागरिकांचा शोध पोलीस लावत आहे.DRI अधिकाऱ्यांच्या मते,हीआतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी आहे.या पूर्वी दोन महिन्यापूर्वी देखील नवी मुंबईतील शेवा बंदरावर देखील 300 किग्रॅ हेरोईन जप्त केली आहे.