मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला असून येथे पाहुण्यांचे जेवण झाल्यावर काही वेळानंतरच त्यांना उलट्या व मळमळीचा त्रास सुरु झाला. अशात त्यांना परिसरातील एमजीएम व घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेवणातील विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.