60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे नुकसान

सोमवार, 31 जानेवारी 2022 (10:32 IST)
अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे. पावसामुळे पीक खराब झाला आहे. या मुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना सामोरी जावे लागत आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना पडला आहे. दुष्काळात तेरावा अशी म्हण चरितार्थ झाली आहे. लातुरात. लातूर तालुक्यात भिसे वाघोली शिवारा येथे शॉट सर्किटने लागलेल्या आगीमुळे 60 एकर ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत 20 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कारभारामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षतेमुळे हे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 
 
मांजरा आणि विकास सहकारी कारखान्याच्या हद्दीत उसाची लागवड केली जाते. या ठिकाणी गाळपाची सोय असल्याचा नगदी पिकाचा फायदा शेतकऱ्यांना होतो. 

भिसेवाघोलीत 60 एकरात ऊस लागवड केली आहे. हा ऊस तोडणीलाच आला होता. रविवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत हे ऊस जळाले आहे. शॉर्ट सर्किटच्या एका ठिणगीने पाहता-पाहता रौद्र रूप घेत 60 एकरातील उसाला जळून खाक केले. या उसावरच शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थनियोजन असते. या भागात ऊसच मुख्य पीक आहे. आगीत झालेल्या नुकसानीमुळे 20 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आगीत उसाचेच नाही तर इतर शेती साहित्याचे नुकसान देखील झाले आहे.  
 
आगीची माहिती मिळतातच विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत आगीने उसाचे भक्षण केले होते. 

या घटनेची माहिती मिळतातच महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचे नमूद केले आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत केली जाईल असे आ.धीरज देशमुख यांनी सांगितले आहे.     
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती