तर हे भाजपला नक्की महागात पडेल – संजय राऊत

सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:39 IST)
पाच राज्यांच्या विधानसभांचे रणशिंग फुंकले असुन राजकिय पक्ष आणि नेते आपले कसब पणाला लावत सत्ता वर्चस्वासाठी गतीमान झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूकीच्या अनुशंगाने भाजप शासकिय यंत्रणेवर दबाव आणत आहे. असे सांगताना उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भाजप शिवसेनेला घाबरते, म्हणून ते हे सगळं करताहेत. ही लोकशाही नाही असे ही ते यावेळी म्हणाले.
 
शिवसेनेच्या उमेदवारांना धमकावलं जातंय. पण भाजप आता ते जे करते आहे ते त्यांना भविष्यात नक्कीच महागात पडणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आतापर्यंत शिवसेनेच्या ५-६ उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीर ठरवत रद्द करण्यात आले आहेत. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. गोव्यातही असाच प्रकार सुरू आहे. एकतर आमच्यामुळे त्यांचा पराभव होईल, किंवा आम्ही जिंकू, या कारणांनेच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आमची भीती वाटतीये,” असा दावा संजय राऊत यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती