निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे

रविवार, 30 जानेवारी 2022 (17:56 IST)
औरंगाबाद येथे एका विवाहित तरुणाने निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशा आशयाचे बॅनर शहरातील चौकात लावलेले होते. या बॅनर मुळे चर्चेला उधाण आला असून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत या बॅनरवर शाई टाकून हे बॅनर फाडून टाकले आहे. रमेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. रमेश पाटील यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असून तो विवाहित असून त्याला तीन अपत्य आहे. औरंगाबादातील रमेश यांना निवडणूक लढवायची इच्छा होती मात्र लॉक डाऊन मध्ये तिसरे अपत्य झाल्यामुळे निवडणुकीत उभारण्यासाठी ते अपात्र असल्यामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. पण आता रमेश यांनी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहिलेले बॅनर संपूर्ण शहरात लावले असून त्याच्यावर त्यांनी बायको कशी असावी, बायकोचे वय आणि ती कशी असावी , वय 25 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे, दोन अपत्यांपेक्षा जास्त नसावे.जाती ची अट नाही विधवा, घटस्फोटित चालेल, मला तीन अपत्यांमुळे मी निवडणूक लढू शकत नसल्याने मला निवडणूक लढण्यासाठी बायको पाहिजे असे या बॅनर मध्ये लिहिलेलं आहे. 

मात्र या बॅनर वरून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन बॅनर फाडून या रमेश पाटील वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मुळे आता हे बॅनर प्रकरण चिघळले आहे. या बॅनरची राज्यभरात चर्चा आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती