नाशिक च्या सय्यद पिंप्रीमध्ये वीज पुरवठा व्यवस्थित आणि पूर्ववत व्हावा या साठी शेतकऱ्यांनी शोले स्टाईल मध्ये आंदोलन केले आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पिकाच्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. यंदा मुबलक प्रमाणात प्राणी असताना देखील शेतकऱ्यांना काहीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा पिकाचे खूप पाणी न मिळाल्यामुळे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. नाशिक मध्ये सय्यद पिंप्री येथील शेतकरी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नाराज होऊन ते शोलेच्या स्टाईल मध्ये उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवर चढून आंदोलन करत आहे.