गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर ही कारवाई आज स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे करण्यात आली. या कारवाईत 89 गावठी बॉम्ब, चार काडतूस, बंदुकीच्या नळ्या असा माल जप्त करण्यात आला आहे.हे सर्व साहित्ये शिकाऱ्याच्या उद्देशाने ठेवल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे गावठी बॉम्ब तीस हजार रुपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सादिक खान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या कडून हे गावठी बॉम्ब सापडले आहे. त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. स्थानिक अन्वेषण गुन्हे विभागाने बांदा पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.
एवढा बॉम्बचा साठा कशासाठी जवळ बाळगण्यात आला याचा तपास पोलीस करत आहे. गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक यांच्या साहाय्याने आरोपीच्या घराशेजारी लाकडाच्या माचाखाली ठेवण्यात आला होता तो शोधून काढून आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.