गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच तापला. बहुतांश शहरात 40 च्या वर तर काही भागात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. पण उन्हासोबत वाऱ्याचा वेग अपेक्षित वाढलेला नसल्याने 10 मेपर्यंत राज्यात उष्माघाताने बळीची एकही अधिकृत नोंद नव्हती. मात्र त्यानंतर 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली.
10 मे 2022 पर्यंत राज्यात 25 उष्माघात संशयितांचा मृत्यू झाला होता. त्यात जळगाव 4, नागपूर 11, जालना 2, अकोला 3, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या 25 पैकी 6 मृत्यू हे उष्माघाताचे बळी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं. जालना, उस्मानाबाद, अकोला, जळगावचे प्रत्येकी 1 तर नागपूरच्या 2 जणांचा त्यात समावेश आहे.