चंद्रपूरमध्ये जनरेटरच्या धूरांमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी
मंगळवार, 13 जुलै 2021 (10:53 IST)
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये जनरेटरच्या धुरामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. प्राप्त माहितीनुसार जनरेटरच्या धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. घरात 7 लोक झोपले होते त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याची बातमी आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविले. रात्री वीज गेल्यानंतर डिझेल जनरेटर सुरू केल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक मीडिया रिपोर्टप्रमाणे घरात झोपेत असलेल्या सातही सदस्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. यातील सहा जणांना रुग्णालयात पोहोचताच मृत घोषित करण्यात आले, तर एका सदस्यावर उपचार सुरू आहेत.
अजय लष्कर (21), रमेश लष्कर (45), लखन लष्कर (10), कृष्णा लष्कर (8), पूजा लष्कर (14) आणि माधुरी लष्कर (20) अशी मृतांची नावे आहेत.