विदर्भात किमान तापमानाबरोबरच काही भागात कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान २ ते ३ अंशांची घट झाली आहे. परभणीत किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून तेथे मंगळवारी सकाळी पारा १०.१ अंशापर्यंत खाली आला आहे. सरासरीच्या तुलनेत ७.३ अंश सेल्सिअसने घट नोंदविली गेली आहे. कोकणात किमान तापमान सरासरीइतके होते. आणखी दोन दिवस तापमानातील ही घट कायम राहण्याची शक्यता आहे.