कोविडमधून बरे झालेल्यांपैकी १० रुग्णांमध्ये डोळे व नाकात अनिष्ठ परिणामाच्या तक्रारी कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरांकडे केल्या. नाकाभोवतीच्या मोकळ्या जागेत ही बुरशी जागा धरून राहाते. नाकातून सतत स्त्राव होणे, तीव्र डोकेदुखी व एखादी बाब दोनदा दिसून येणे, अशी लक्षणे आढळली. डॉक्टरांना ही माहिती दिल्यानंतर हा म्युकरमायकोसिस आजार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी उपचारही सुरू केला आहे.