गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे. या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश ॲग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
झालेले सामंजस्य करार :-
( कंपनी, सेक्टर, ठिकाण, गुंतवणूक, रोजगार या क्रमाने ) ग्राझिम इंडस्ट्रिज लिमिटेड, केमिकल, महाड, १०४०, ५००. एसएमडब्लू प्रा. लि., अलॉय स्टील, देवळाली, १५८२, १५००. गॅँट क्यू स्टील, इंजिनिअरिंग, सुपा, १२५, १३०. सोलर एव्हीएशन प्रा. लि., सोलर, नवी मुंबई, ५००, ४५००. डागा ग्लोबल केमिकल प्रा. केमिकल, अति. कुरकुंभ, १४२, ३९०, पद्मावती पल्प अँड पेपर्स क्राफ्ट पेपर्स, अति. अंबरनाथ, २००, ४००. वंसुधरा ब्रदर्स प्रा, लि., मेडिकल, ऑक्सिजन, अति. लोटे परशुराम, १३२, ११५. एअर लिक्विड, फ्रान्स, ऑक्सिजन, बुटीबोरी १२०, ५०. सुफलाम इंडिस्टिज प्रा., इथेनॉल निर्मिती, देवरी ४००, ४००. एलजी बालकृष्णन, अँड ब्रदर्स प्रा. लि., ऑटोमोबाईल, अति. बुटीबोरी ३६०, ५००. देश ऍग्रो प्रा. लि., अन्न व प्रक्रिया, अति. लातूर, २००, १६०. डी डेकॉर एक्सपोर्ट्स, टेक्सटाइल्स, तारापूर, २५०, ६००५०५१, ९१४५.