राज्यातील 105 आगार सुरु होऊन 19 हजार कर्मचारी कामावर रुजू

मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (19:46 IST)
एसटीच्या कामगारांचे संप एसटीचे राज्यसरकार मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी घेऊन मागील महिन्याभरापासून सुरु आहे. या दरम्यान काही एसटी कामगारांना निलंबित करण्याची प्रक्रिया ही करण्यात आली. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली. संपाच्या पार्श्ववभूमीवर40 हुन अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब  यांनी कामगारांना कामावर पुन्हा रुजू होण्याच्या आवाहनाला चांगला प्रासाद मिळाला असून राज्यातील 105 आगार सुरु झाले आहे. आगार सुरु झाले असून तब्बल 19 हजार एसटी कर्मचारी आपल्या कामावर रुजू झाले आहे. ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती