महिलांसाठी आजपासून बस प्रवासात 50 टक्के सवलत

शुक्रवार, 17 मार्च 2023 (11:02 IST)
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महिलांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक योजना राबवण्याचे सांगितले होते. एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली होती. या आदेशाचा जीआर निघाला असून आज शुक्रवार पासून एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या तिकिटात 50 टक्के सवलत देण्यात येईल. या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.  
 
9 मार्च रोजी शासनाकडून एसटी प्रवासातील सवलतीबाबत घोषणा झाली होती.  तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची म्हणजे जीआरची   आवश्यकता असते. शासन आदेशा शिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता.आज जीआर मिळाला असून आजपासून एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे.  
 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती