लातूरच्या शासकीय वसतिगृहाच्या अन्नातून 50 विद्यार्थिनींना विषबाधा, रुग्णालयात दाखल

रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (15:54 IST)
लातूरच्या एका शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वसतिगृहात रात्रीचे जेवण केल्यावर 50 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. 

लातूरच्या शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या वसतिगृहात 324 विद्यार्थिनी राहतात. रात्रीचे जेवण केल्यावर 50 विद्यार्थिनींची प्रकृती ढासळली आणि त्यांना उलट्या, पोटदुखी, मळमळचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले. सुदैवाने सर्वांची प्रकृती उत्तम आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणात भात, भेंडीकरी, आणि मसूरचे सूप दिले होते. ते खाऊन लगेचच त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आली. 
 
पोलिसांनी घटनास्थळ गाठून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. नमुन्याचा अहवाल आल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण समजेल.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती