सोमवारी रात्री विद्यार्थ्यांना जेवण्यात मूग डाळ, दुधीची भाजी चपाती आणि भात देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केले आणि खंबाळे, नानिवली, खंबाळे, तांदुळवाडी, नंडोरे आणि इतर 11 आश्रमशाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी उठल्यावर उलट्या, पोटदुखी, जुलाब आणि मळमळ सारखा त्रास सुरु झाला.
त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले असून आरोग्य विभागाकडून सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि विद्यार्थ्यांसाठी जेवण पुरवणाऱ्या आणि बनवणाऱ्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्न व औषध विभागाचे निरीक्षक आणि पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांनी सोमवारच्या रात्रीचे जेवण्याचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार आहे.