काबुल विमानतळावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (14:23 IST)
अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावर सोमवारी झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी रक्ताने माखलेले मृतदेह पाहिले आहेत. गोळीबार कुणी केला याबाबत वृत्तात माहिती देण्यात आलेली नाही.
 
गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याची बातमी समोर आली होती. देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. विमान सेवा मर्यादित असल्याने गोंधळाचं वातावरण होतं.
 
काबूलचे विमानतळ बंद; हजारो नागरिक प्रतीक्षेत
काबूलचे विमानतळ आता बंद करण्यात आले आहे.
 
हजारो अफगाण नागरिक सुरक्षिततेच्या कारणास्तव देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर जमा झाल्याचे फोटो, व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते. गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबारही केला होता. मात्र आता विमानतळाचं कामकाज बंद करण्यात आलं आहे.
 
सध्याच्या घडीला काबूलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. आपल्या नागरिकांना तसंच दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानच्या बाहेर नेणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती