जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (10:56 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून आज देशभर आज ‘जन आशीर्वाद’ यात्रा सुरु करण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेत केंद्र सरकारचे 39 मंत्री हे देशभरातील 212 लोकसभा मतदार संघात पर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रा ची सुरुवात केली आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्री व दिंडोरी मतदार संघाचे खासदार भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघरमधून जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, जन आशीर्वाद यात्रेला राजकीय दृष्टीनं बघू नये. राज्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांनीही आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरु केल्या आहेत. 
 
भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा 19,567 किमीहून अधिक लांबीची असणार असून ती 19 राज्यातून जाणार आहे. या दरम्यान 1663 लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका असल्याने या जन आशीर्वाद यात्रेमध्ये त्या राज्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येतअसल्याचं समजतंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती