अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. याशिवाय हे दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत.
मेळघाटात पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे. मेळघाट, चिखलधरा लगतच्या गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र, लोकप्रतीनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. नागरीकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असून हे पाणी पिल्यामुळे गावात अनेकांना खोकला, पोट दुखी, सारखे आजार झाले आहेत.