पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहर पोलिसांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे ने जिवंत काडतुसे आणण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानकात सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. हे दोघे शुक्रवारी रात्री रेल्वे ने चंद्रपूरला आले होते.
यांना घेण्यासाठी जिल्हाप्रमुख आपल्या वाहनाने आले होते. ते त्यांना घेऊन घरी गेले. पोलिसांना त्यांच्या वाहनाची लोकेशन मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्या पाठलाग करत त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांना घरात येण्यास रोखण्यात आले. नंतर पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी घराची झडती घेतली त्यात त्यांना 40 जिवंत काडतुसे 1 मॅगझीन आणि एक तलवार सापडली.