चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

सोमवार, 13 मे 2024 (19:04 IST)
राज्यातील चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला ठार मारण्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मोनू गणपत जैस्वाल असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सागर उर्फ दिलीप कुंता असे आरोपीचे नाव आहे. 

हे प्रकरण चंद्रपुरातील घुग्गुस शहरातील आहे. मिळलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत व्यक्तींनी दोघांनी एकत्र मद्यपान केले या नंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.आरोपीने मोनूवर 1500 रुपये चोरल्याचा आरोप केला या वरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि आरोपी सागर ने मोनूला काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

या मारहाणीत मोनूच्या डोक्यावर, हातावर, चेहऱ्यावर, आणि प्रायव्हेट पार्टवरला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला या मुळे मोनूचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना दारूच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या फुटेज मध्ये आरोपी मोनूला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 

हत्येची माहिती मिळतातच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी आरोपी सागरवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती