विशेषता उन्हाळी सुट्टीदरम्यान गोव्याला कोकण, मालवण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. याकरीता प्रवाशी तीन ते चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे तिकीट बूक करत असतात. मात्र ऐनवेळी बऱ्याच प्रवाशांना गर्दी आणि धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते थिवीम स्थानकादरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाळी सुट्टीदरम्यान गोव्याला कोकण, मालवण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. या काळात रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी असते. परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे उन्हाळी सुट्टया सुरू झाल्याने कोकण मार्गावरील गाड्यांमध्ये वाढ करण्याची प्रवाशांची मागणी असते. या मागणीला मध्य रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तसेच, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते थिवीम स्थानकादरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.