महाराष्ट्रावरील 'बर्ड फ्लू'चं संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. राज्यात दिवसात तब्बल २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण २,०९६ पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया आणि चंद्रपूर भागातील पक्ष्यांचे नमूने हे बर्ड फ्लू संसर्गाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत.