आता बोला, २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा दुसरा डोसच घेतला नाही

गुरूवार, 13 जानेवारी 2022 (08:30 IST)
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या बूस्टर डोसला सुरवात झाली असताना जिल्ह्यातील २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या डोसच घेतला नसल्याचे धक्कादायक बाब उघड झाली आहे.
 
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सुरवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसचं घेतला नसल्याचे समोर आले आहे. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू होऊनही अद्याप जिल्ह्यातील जवळपास २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. याबद्दल आरोग्य विभागाने  चिंता व्यक्‍त केली आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर आता नव्याने बूस्टर डोस देखील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच कोरोनाच्या दुसऱ्या डोस कडे पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अद्याप दुसरा डोसच घेतला नसल्याने तेव्हा बूस्टर डोस हे कर्मचारी घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती