अनिशा शर्मा असं या मुलीचं नाव असून, कांदिवली पश्चिममध्ये लालजी पाडा इथं सीएम चषकच्या स्पर्धा सुरू आहेत. सी एम चषक ही स्पर्धा सुरू होती. तिथे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अनिश शर्मा (वय १२) ही मुलगी डान्स करत असताना स्टेजवर कोसळली. तिला तातडीने कांदिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. या मुलीला फिट आल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा सुरु असून कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.