मोठी बातमी, १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सोमवार, 12 एप्रिल 2021 (15:42 IST)
राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या शालांत परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अशात मोठा निणर्य घेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं गेलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्या गेल्या आहे याची खूप दिवसांपासून मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. 
 
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.