शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, 266 पदांची होणार भरती

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (09:31 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण 266 पदांसाठी ही भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नोकर भरतीबाबत ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे.
 
ट्विटच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांसाठी भरती होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिक्षण विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
 
दरम्यान, ही भरती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील 50 टक्के नियुक्ती देण्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. pic.twitter.com/LgeoIbO7k4

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 29, 2021

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती