‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द करा!

मुंबई : ‘कमळ’ हे राष्ट्रीय फूल असल्याने भारतीय जनता पार्टीला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द केले जावे, अशी  याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. ही याचिका पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणीसाठी न्यायालयापुढे येण्याची अपेक्षा आहे.
 
 ‘कमळ’ निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडून मागवून घ्यावे व तसे करणे योग्य की अयोग्य याचा निकाल होईपर्यंत हे निवडणूक चिन्ह गोठविले जावे, अशीही मागणी याचिकेत केली गेली आहे. भाजपाला ‘कमळ’ या राष्ट्रीय फुलाचा निवडणुकीसाठी वापर करू देणे हा १९५० च्या राष्ट्रीय चिन्हे अणि नावांच्या दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याचा भंग आहे. त्यामुळे भाजपाला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द करण्याचा आदेश निवडणूक आयोगास द्यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.

वेबदुनिया वर वाचा