मुंबईकरांना ‘स्वाइन’चा धसका

बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (11:12 IST)
मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ होत असून एकाचा मृत्यू झाला आहे. या आजाराचा विळखा वाढत असल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे.

वांद्रे परिसरात राहणाºया ३० वर्षीय तरुणाचा स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. २ आॅगस्ट रोजी या रुग्णाला गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ आॅगस्टपासून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा १९ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. मुंबईत आॅगस्ट महिन्यात १३ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे, तर जानेवारी ते २५ आॅगस्टदरम्यान स्वाइन फ्लूमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा