महिला कर्मचार्‍याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी न्यायाधिश निलंबित

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (17:12 IST)
मुंबई सत्र कोर्टाचे न्यायाधीश एम.पी.गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर सहकारी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या नार्कोटीक कोर्टाचे काम पाहणारे न्यायाधिश गायकवाड यांच्यावर कोर्टातीलच एक कनिष्ठ महिला कर्मचारीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. न्यायाधिश गायकवाड यांना चौकशी सुरु असून ती पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.
 
न्यायाधिश गायकवाड यांनी संबंधित महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महिलेने केलेले आरोपात तथ्य असल्याने मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता गायकवाड यांच्या प्रकरणाची विभागीय चौकशी न्यायाधीश एस.डी.तुलानकर यांच्या नेतृत्त्वाखाली होत आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील प्रमुख न्यायालयातील न्यायाधिशांनी आपल्या सहकारी महिला न्यायाधिश, कनिष्ठ महिलांचे, इंटर्न युवतींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा