महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (11:03 IST)
विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पाऊस नसल्याने केलेली पेरणी वाया गेली आहे. दुबार पेरणीची शक्यताही नसल्याने यंदाचा हंगाम वायाच गेला आहे मात्र, हे कटू सत्य पचवून पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चार्‍यासाठी शेतकर्‍यांना दाहिदिशा भटकंती करावी लागत आहे.

विहींनी तळ गाठला आहे तर कुपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. दुष्काळच्या झळा सोसणार्‍या अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी स्वत:हून चारा छावणी सुरु केली आहे मात्र, शासनाने अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत.

वेबदुनिया वर वाचा